स्पर्शाचे उणे झाले …

आज परत तोच  भावनारहित खेळ झाला
ढग दाटून आले ,विजाचाही कर्कश झाला …
पण स्वभावाचे देणे आले आणि
पाऊस मात्र सुकाच झाला …
असे असले तरी हिरवी पालवी मात्र
आठवणी आणि वाटेच्या आशयाने रड-रडली
चार दिवसाचा संसार झाला
बाकी मात्र आठवणीच्या राहिल्या… 
अबोल मनाचे शब्द किती दिवस सहन करायचे
आकोर्षाने हृदय इचे रोजच रक्तबंबाळ व्हयाचे…. 
खंभीर उभी मी जीवनाच्या वाटेवर
काटा विषारी रोजच रुततोय आशेवर
प्रेमाची कबुली रोजच देतो पण
हृदयच नसे  ज्याला तो श्वासाला मोजतो …
भाग्यवान मी  म्हणून स्व:  जपते आणि
पदर  माझा रोज ओलाच भरते
वेदनाही  आता  व्याकुळ  होतात
अश्रू हि आता रडवा गातात …

श्वेता वासनिक
नवी मुंबई