असमतोल

सगळेच कौरव आता 

माजले आजूबाजूला
मरणातुनी जन्म त्यांचा
त्वरित पाहा झाला
दुर्योधन शिक्षेविना फिरती
रोज रडती बाला
छेडछाड बळजबरी
हाच आता मंत्र झाला
दुः शासन दुर्लक्ष करी 
लोक कचरती दाद मागावयाला 
जगणे स्वैर झाले म्हणती
रावण आता निर्लज्ज झाला
राम गेला , बिभीषण गेला
सती आता सती गेल्या
जाहल्या मोकळ्या रांडा 
समाजाला घालिती गंडा
रोजचेच हे आता
रोजचीच भांडणे आता
संत, महंत, बुवा , बापू *
म्हणती कसा कुणाला कापू ?
उमलताची घरातली कळी 
गिधाडे घालतात घिरटी 
भ्रमर पाखरे लुप्त होती 
आता फुले बंदिस्त झाली 
संभवामी  युगे युगे
गीतेपरते राहिले
सामान्य वाट पाहती 
येतील का कधी छत्रपती 
तरीही माझा भारत महान 
जाहली संस्कृती लहान 
* (योग्य बापूंची क्षमा मागून. )