अशी मुभा असते का?

     सलमान खानचा खटला भारतीय न्यायव्यवस्थेच्या वेगानुसारच चाललेला आहे.  खटल्याची संपूर्ण बारा तेरा वर्षे सलमानखान चित्रपटाचे चित्रीकरण करत राहिला. सर्वसामांन्यांची भावना अशी  - एकीकडे खटला सुरु आहे व दुसरीकडे हा माणूस चित्रपट करत आहे, पैसे मिळवत आहे. ही न्यायव्यवस्थेची चेष्टा आहे. 
  जशी सवलत सलमानला मिळाली तशी सर्वसामान्यांना मिळते का? एखादा कारकून असेल, त्याच्यावर लहानसा का होईना खटला असेल तर त्याला तो संपेपर्यंत नोकरीवर जाण्याची मुभा असते का?