शांती समाधान आवश्यक आहे काय?

खरे तर आजकाल होणाऱ्या शेतकऱ्यांचा आत्महत्या , निरनिराळे संप , तसेच निरनिराळ्या  ठिकाणी घडणारे अत्याचार हे सर्वच शांती व समाधान समाजातील नाहीसे झाल्याचे द्योतक आहे पण हे शांती समाधान का समाजातील नाहीसे झाले आहे? मला वाटते याला कारण आपले नेते मंडळीच  आहेत आज जे निरनिराळे प्रश्न आहेत त्यापैकी काही  हे समाजा मध्ये या नेते मंडळीनी टाकलेली ठिणगी हेच आहे आज  किती कर्मचाऱ्यांना पगार खराच कमी पडत असेल याचा विचार न करता , किंवा त्याच्या कामाचा उरक याचा हिशेब ही मांडली करत नाहीत पण त्यांना संप करायला चिथावणी देतात.व नंतर मागण्या मान्य नाही झाल्या तर तो संप लांबवितात. यात सामान्य माणूस भरडला जातो कारण मागण्या ज्या कर्मचऱ्याच्या नावाऱ्याचाने  करतात त्यातील कमी पगार वाले कर्मचाऱ्याच्या  प्रमाणात त्याच्या वरच्या अधिकाऱ्या चा पगाराचा हिशेब होत असतो त्यात हे असमाधान  परत निर्माण होते  व नेते लोक पण आपली पोळी भाजून घेण्यासाठी त्याचे असमाधान जागृत  ठेवतात.                            आपली    संस्कृती  खरे तर समाधान कसे राखावे हे शिकवते असे असताना लोक याला बळी का पडतात देवच आपल्याला देतो व आपले काढून घेतो अशी आपली असलेली समजूत या मंडळीनी नाहीशी केली आपल्याला  जर महासत्ता व्ह्यायचे असेल तर शांती व समाधान हे पैशाने मिळत नाही तर ते मानण्यानेच मिळते . तेव्हा ते समाधान कसे मिळेल ते  पाहावे.