" नेता निवडून येता"
मोठी मोठी आश्वासने देऊन नेता , गेला हो गेला हो गेला हो ।
पाच वर्षॅ नाही पुन्हा भेटला गेला हो , पाच वर्षे नाही पुन्हा भेटला॥ध्रु॥
विज देतो, पाणी देतो, राहण्यासाठी घर देतो ।
निरनिराळ्या योजनांचे , गाजर आम्हा दावितो॥
त्या समयी आम्हा तो, देवदूत वाटला हो वाटला॥ध्रु॥पाच वर्षे॥१॥
लाल दिव्याच्या गाडी मधुनी , जाता येता तो दिसतो।
चंद्रमौळी झोपडीला , काचे मधुनी तो बघतो॥
निर्लज्यपणाचा कळस ,त्याने गाठला हो गाठला ॥ध्रु॥ पाच वर्षे॥२॥
अनंत खोंडे.
२।५।२०१५.