मकरंद
गूज तुझे माझे
नजरेत बंद
डोळा मकरंद
सेवियेला
मोगऱ्याचे भाग्य
खुलले श्वासात
उरात वसंत
गंधाळला
अवसेची रात
झाली चांदरात
सखी लोचनात
डुंबताना
संवाद गुंगला
कापऱ्या ओठात
भावनांचा दूत
स्पर्श झाला
स्पर्श पाझरला
स्पर्श ओथंबला
स्पर्शच बोलला
प्रेम भाव.............!!!
उद्धव कराड ( मो. नं. ९८५०६८३०४५ )
मु. जळगाव, ता. निफाड, जी. नासिक.