शोधू कुठे....

शोधू कुठे....

ओझरता स्पर्श
मनोमनी हर्ष
विसरुनी गेलो
विचारायचे नाव

ढळता पदर
चळती नजर
खिळवुनी गेले
चेहऱ्यावरील भाव

अनोळखी लोक
अनोळखी गाव
शोधू कुठे
लागेना ठाव

राजेंद्र देवी