मिनेसोटा लँडस्केप आर्बोरेटम

नमस्कार,बऱ्याच वर्षांपासून आमच्या शहरातील लॅंडस्केप आर्बोरेटम पाहायचे ठरवत होतो. मात्र काहीना काही कारणामुळे ते मागे पडत  होते. या लांब विकांताला मात्र आर्बोरेटम पाहायचा योग जुळून आला. मिनेसोटा विद्यापीठातील एक विभाग म्हणजेच लॅंडस्केप आर्बोरेटम. आर्बोरेटम जवळजवळ १,१३७ एकरांमध्ये पसरले आहे. १९०७ साली आर्बोरेटमच्या आजच्या जागेवर हॉर्टिकल्चर संशोधन केंद्र सुरू झाले. १९५८ साली आर्बोरेटम लोकांसाठी खुले करण्यात आले. तोपर्यंत इथे सुमारे पाच हजार वेगवेगळ्या प्रजातींची झाडे लावण्यात आली होती. हे आर्बोरेटम शास्त्रज्ञ मंडळींनी चालवलेले उद्यान आहे, त्यामुळे लौकिकार्थाने ते आखीव रेखीव मात्र नाही.व्हिजिटर सेंटर समोरील या आकर्षक मोराने आमचे स्वागत केले.Lego Peacockआर्बोरेटम वर्षातून केवळ २ दिवसच (क्रिसमस व थँक्सगिविंग डे) बंद असते. तुम्ही येथे केव्हा जाता याला खूप महत्त्व आहे कारण वेगवेगळ्या झाडांच्या बहरण्याचे ऋतू वेगवेगळे असतात. आम्ही खास करून येथे ट्यूलिप्स पाहायला गेलो होतो. तरीही थोडासा उशीरच झाला जायला असे वाटले कारण की काही ट्यूलिप्स सुकू लागले होते. मात्र मोठ्या संख्येने बरेच ट्यूलिप अगदी ताजे दिसत होते. त्यांची झलकTulips 1Tulips 2Tulips 3Tulips 4Tulips 5ट्यूलिप्सच्या बागेतून फिरताना बाळगोपाळांचा उत्साह तर जाणवत होताच पण दुसरे बालपण सुरू असलेल्यांचाही काही कमी नव्हता.     Tulips 6ट्यूलिप बरोबरच असंख्य प्रकारची गुलाबाची झाडे रोझ गार्डनमध्ये  होती. मात्र ती बाग अजून बहरली नव्हती. तिथेच असलेली काही कारंजी मात्र खूपच मोहक होती.FountainFountain रोझ गार्डनमधील हा एक गझीबोGaziboTemple like structureट्यूलिप्स व रोझ गार्डनव्यतिरिक्त इतर अनेक गार्डन्स आहेत जसे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या विविध हर्ब्जचे गार्डन, चायनीज, जॅपनीज गार्डन इत्यादी.BenchesGreeneryदीड दोन तास भटकून झाल्यावर आम्ही खुल्या ट्राममधून मिळणारी तासाभराची गायडेड टूर घेतली. या ट्रामचा चालक अन  टूर गाईड एक सत्तरीतला उमदा तरुण होता. त्याचे सहजशैलीतील वर्णन ऐकता ऐकता एक तास कसा निघून गेला ते कळले नाही.Tour Guideया टूरदरम्यान काढलेले फोटोजCurved trailPink TreesColorful TreesGirls near fountainयेथे स्कल्पचर गार्डन आणि सध्या अमेरिकेतील बाळ गोपाळांचे आवडते असे लेगो  वापरून तयार केलेल्या आकर्षक आकृत्या जागोजाग दिसल्या.Sculpture Gardenनातवाला बागकाम शिकवणारे एक आजोबा.  Grandpa grandsonButterflyHummingbirdTurtleव्हिजीटर सेंटरमधील गिफ्ट शॉपीमधून souvenirs खरेदी करून आमच्या या भेटीची सांगता झाली.Souvenirएकंदरीतच ही जागा खूप आवडल्याने येथे परत फॉल सीझनमध्ये परत जायचा मानस आहे. येथे विनामोबदला काम करणाऱ्या शेकडो हौशी स्वयंसेवकांना मन:पूर्वक धन्यवाद. टीप: फोटो मोठे करुन पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करावे.