फुलपाखराचे संदर्भ

त्या खोल दरीत डोकावताना 
लोखंडी पाईपाच्या  रेलिंगवर 
पंखाची शीड उभारून बसलेले एक फुलपाखरू 
तो जवळ गेला  तरी ते ध्यान मग्न 
प्रथमच आयष्यात बोटाची पकड करून तो गेला  त्याच्या जवळ 
तरी ते तसेच 
अलगद धरले चिमटीत
मग  
सुरु झाली त्याची जीवघेणी धडपड 
कोठे इजा करायची होती त्याला… ? 
दाखवायचे होते  पोराला फक्त त्याचे काळे भोर डोळे 
त्याचे चिमुकले पंख 
त्याच्यावरचे ठिपके डोळ्यांसारखे  
ओरडले कोणीतरी 
आणि अलगद दिले ठेऊन 
त्या लोखंडी पाईपावर 
एक पंख गळून पडला 
नि ते कोसळून गेले दरीत 
आणि  म ग मनही त्याचे  ……. 
तिचे   मन तसेच होते 
फुलपाखराच्या नाजूक पंखाचे 
तिचे  मनही असेच धरले होते त्याने  
हलक्याच हातांनी चिमटीत 
आणि तिनेही  दिले तिचे पंख 
अलगद सहज कळत नकळत 
त्या फुलपाखरासारखे 
फिरायचे  होते त्याला तुझ्या सोबत 
झुलायचे होते फुलपाखरा सारखे 
आणि अचानक तो गेला  दूर देशी 
तो  गेल्यापासून ती  अबोल झाली
मौनात गेली
ती कोसळून  गेलीस 
नि त्याचे  मनही …….  
कसे आठवून जातात 
भूतकाळातील 
फुलपाखराचे संदर्भ
प्रकाश