श्रावण...

श्रावण...

आला रे आला
पुन्हा श्रावण आला
घेऊन आठवणींचा झुला

हिंदकळती आठवणी
पाणथळल्या वळचणी
इंद्रधनूचा घेऊन झुला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

बहरली माती
हिरवीगार शेती
मृदगंध आसमंती दाटला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

ऊनपावसात लागे
कोल्हाकोल्हिचे लगीन
ढगांचा बॅड वाजला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

केतकीच्या बनात
मयूर पिसारा फुलला
सर्वत्र केकारव घुमला
आला रे आला
पुन्हा श्रावण आला

राजेंद्र देवी