अस्तित्व देवाचे

आश्वस्त अता व्हावेच कोणा सांगत सृष्टि नाहीं !
जेवून भले गेले जरी पत्रावळ उष्टी नाही !!

तारे अन  पृथ्वी का  मला  सांगावच सक्ती नाहीं !
आता निजरूपे  दाव  विश्वात्म्या मज दृष्टि नाहीं !!

देवत्व कशाचे तेच आता सांगा जर हट्टी नाहीं
झाकाव गुपीते ऐवढी  लाखाची मज मुष्टि नाहीं !

आश्वासन दे तृष्णेस धरेच्याही तिज तृप्ती नाही
सारेजण ओवाळी तुला, खाली बघ वृष्टि नाहीं!

द्यावीत सुखे  तू सर्व सार्‍यांना क्षण मुक्ती काही
आस्तित्व तुझे  देवा न मानावे ह्या मग पुष्टि नाहीं !!

विलास खाडे