कणा...

कणा...

सुखाचा सागर
नशिबाची होडी
वारा फिरवी पाठ
वल्हवी दोन हाताची जोडी

कैक किनारे सोडले
कैक किनारे जोडले
ना भय मज आता
जरी आली जगबुडी

शिडं नियतीचे फडफडे
सागरा उधाण चढे
कणखर आहे कणा
जरी सुकाणू मोडे

राजेंद्र देवी