गोडी

लग्न होते…  मुलगी बायको बनते
संसार सुरु होतो … नवऱ्याची गोडी लागते
नात्याची कसोटी असते …. सांभाळण्याची रीत अचूक ठरते
दूर -दूर  राहूनही प्रेमाची वाख्या मात्र सगळ्यांची सारखीच असते ….
भांडण -तंटे ,,, नखरे -बावरे  सुरूच असते
संसाराची गाडी मात्र  ४० च्या स्पीड वर रुळावीच  लागते ….
संसार सुरु असतो ,,,बायको सून बनते
वेळेचे भान आणि लोकांचे टोन्ट
सासू -नंदेचे  बोल ,, सहनशीलतेचे तोल सांभाळायचे असते ….
शेवटी लाग्ग्नाची रीत निभावावीच लागते …
मग होतो जन्म बाळाचा आणि
पुन्हा मुलगी आई बनते ….
संसार सुरु असतो आणि तोतड्या शब्दाची गोडी लागते
अंगणभर धिंगाणा आणि स्व्यापैकाची चूल ठरते ….
शेजार्या -पाजार्याची मैफिल रंगते आणि चहाचे पातले रात्री च  न्हवते   ….
शेवटी सगळे सावरवेच लागते …।
मुलांच्या ऑफिस चा  पहिला दिवस
टिफीनच्या नावानी डरकांडी फोडते
थकलेले अंग आता शब्दहीन ठरते
मग होतो आवाज सनई-चौघड्यांचा
आणि पुन्हा मुलगी सासू बनते
रिती-बाती , जबाबदाऱ्याची गाठोडी बाणते
आनंद म्हणून सावरण्याच्या जमापुंजी पुढे करू  बघते …
मात्र घराची दारे बंद झाली दिसतात ,,
फाटकी लुगडी ,, हातात काठी  आणि
रस्त्याला घर बनवावेच लागते
 कारण  आता हि तिला सगळे सावरावे च लागते ….
श्वेता वासनिक,
अकोला