फुंकर

फुंकर

किती जवळून पाहिले
मी तुला
किती जवळून पाहिले
मी जीवनाला

अजून आठवतो तो
झुलणारा झुला
कधी नदिकिनारीचा
गंध तो ओला

कधी हातावर रेखाटताना
मेंदी पंचमीला
कधी हलकेच स्पर्श
गाली रंगपंचमीला

अजून आठवतो त्या
बहरातल्या गुलाबाला
अजून आठवतो
त्या पानगळीला

किती जवळून पाहिले
मी तुला
किती जवळून फुंकरलेस
या काहिललेल्या जिवाला

राजेंद्र देवी