नवीन सून

नवीन सुनेने काय करावे ,, आपल्या घरातील मंडळीना समजून , घरातील परीस्थितीचा सांगावा घेऊन , असमजस आणि बिचकलेल्या नात्यांना कमालीची तडजोड घालून सांभाळावे…
जरी असू आपण लहान आणि अनोळखी  मात्र सगळ्याच जुन्या आणि गहाळ गोष्टीना नवीन करायचे ….
नव्या विचारांनी आणि २१ व्या शतकातील कल्पवृतीची जोड घालून स्वतःची वाहवा मिळवावी …
जेवणातील गोड पदार्थानि तृप्त भावनेच्या मागोवा घेत शिकवणी द्याव्यात …
स्वयंपाकातील भांड्याच्या जोरावर कडकडीत आवाज करावा ……
खोट्याचे खरेपण करावे ,,, शब्दाचे मोतीही करावे  मात्र  अपशाब्दाचे जोरदार निषेध हि करावे ……
असे करतांना मनावर क्रोधाचा ताबा आणि दुसऱ्यांच्या मनाचे धागे हि विनावे ,,
मुलांचे मन जिंकावे आणि गोड पापे द्यावे ,,तोतड्या भाषेतच संस्काराचे धडे गिरवावे …….
त्यानाही वेळ देऊन लपंडावाचे खेळ खेळावे …
मोठ्याच्या  मान -सन्मानाचा पदर नवीनरीत्यात ओढावा …….
आपलाही आवाज आणि नाव नवीनरित्या जोडावे  ……
जीवनसंगिनी म्हणून नवीन सुनेने आपलि ओळखही बदलावी …….

श्वेता वासनिक