गुंतता ह्रदय हे...

गुंतता हृदय हे...

पाहत चंद्रासम चेहरा तुझा
उसळतो मनाचा सागर
पाहता डोहासम तुझी शांतता
भरते मनाची घागर
पाहता डोळे तुझे मृगनयनी
होते जिवाचे पाणी पाणी
पाहता केस कुरळे तुझे
गुंतते हृदय हे माझे
पाहता तुझ्या ओठांची थरथर
स्पंदने होती अलवार
नजरेत तुझ्या असते
खट्याळ दुधारी तलवार
राजेंद्र देवी