स्वप्न माझे एवढे डोळ्यात राहो..

स्वप्न जागे नेहमी डोळ्यात राहो..
मी व्यथेला कोण, ते लक्षात राहो
मी स्वत:च्या मारतो इच्छा हजारो
भाकरी कायम तुझ्या हिश्यात राहो
सर्व इतिहासात गुंजो नाव माझे
धार माझ्या एवढी शब्दात राहो
अमृताला ही असो माझी प्रतीक्षा
अन विषाचा दाह ही रक्तात राहो
सैन्य हे नारायणी मिळूदे तयांना 
कृष्ण माझ्या नेहमी पक्षात राहो
शेर माझे तू कसेही वाच मित्रा
नाव माझे नेहमी मक्त्यात राहो
            -स्नेहदर्शन