शंकर बार

एक होता अँकर

बारमध्ये आला 
तेव्हा झाला त्याचा टँकर
एक दिवस त्याने 
बारमधून आणला शंकर 
प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 
एक बेवडा पण आला 
आल्या आल्या मात्र तो 
टाइट होऊन पडला
मंत्र  कसले तंत्र कसले ? 
पोलिस आले नंतर 
बारबालांची करून फरफट
शेट्टीने केली फारच वटवट 
पैशासाठी मात्र 
झाली नंतर फार कटकट 
मांडवलीचा ठरला भाव 
पोलिसांनी घातला जोरदार घाव 
हे सर्व पाहून , शंकराला फुटला घाम 
गर्दीमधून तो पळू लागला 
घेऊन झंडू बाम
सारेच तेथे बेवडे होते 
स्वतःला विसरलेले
बाटली दाखवून म्हणाले
" हीच गंगा हीच यमुना,
हीच आज गटारगंगा
बिडी काडी नाही उपयोगी "
शंकराकडे पाहून म्हणाले
" अरे ! हा तर योगियांचा योगी, 
नवसागराचे काम आहे 
काळा गूळ गोड आहे 
आजच्या दिवसात उतरली 
तर शेट्टी पैसे वापस करणार आहे". 
झिंगणाऱ्या हवेमुळे मग 
शंकरही हाले मागेपुढे
" आपण आपले जागेवर बसावे
मूर्तीसारखे डोळे मिटावे
नाहीतरी मृत्युलोकच आहे 
इथे  जीवन भयंकर आहे"
अभयंकर असूनही 
घाबरलेला तो शंकर 
उडी मारून मूर्तीगत 
कौंटरवर गुपचुप बसला 
शेट्टीसहीत सगळेच मग 
फुकटची पिऊन 
झिंग झिंग झिंगले आणि 
लोळून लोळून झोपले.