वेळ आहे...

वेळ आहे...

भेदुनी ढगांचा झिरझिरीत पडदा
रविकिरणे अवतरली
उद्याची सुंदर सकाळ
बघ आजच अवतरली

झटकून टाक आळस
उजळुनी ज्ञानाचा दीप
निराशेचा भेद पडदा
बघ आशा आजच पालवली

आशानिराशेचा हा
तुझ्या मनाचा खेळ आहे
आपले भवितव्य आपणच ठरवू
तेवढा हातात जरूर वेळ आहे...

राजेंद्र देवी