कल्पांत

कल्पांत

काय करावे कोठे जावे
असतो डोळ्यापुढे अंधार
घेत असतो कोठल्यातरी
भिंतीचा तो आधार

चिंताग्रस्त चेहरा अन
खाण्याची असते भ्रांत
करीत असतो बेवारस
रस्ते तो पादाक्रांत

थकून भागून होउन क्लांत
झोकून देतो पदपथावर स्वतःला
त्याच्यासाठी असतो
हाच खरा कल्पांत

राजेंद्र देवी