सामर्थ्य तेव्हाचे व आताचे

सध्या बाजीराव मस्तानी या विषयावरून  बरीच चर्चा सुरु आहे.  त्या संदर्भात वाचनात आलेली एक ओळ अशी- बाजीरावाच्या तलवारीचे वजन 40 किलो होते.  
या मुद्यावरून पडलेले काही प्रश्न असे-
1. तलवारीचे वजन 40 किलो होते तर त्या अनुषंगाने तत्कालीन पुरुषांची उंची, वजन, ताकद हे तीनही घटक आत्ताच्या तुलनेत खूप असायला हवे. जसजसा काळ सरकत गेला, तसतशा ह्या क्षमता कमी होत गेल्या असाव्यात . हे बरोबर आहे का ? उदा. तीनशे वर्षांपूर्वी सरासरी शारीरिक उंची साडेसात फूट होती, कालांतराने ती सहा फूट झाली, कालांतराने पाच  फूट झाली इत्यादी.
2. क्र.1 चे अनुमान व  प्रश्न बरोबर असतील तर  लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर  असलेले जीव  अक्षरशः महाकाय स्वरुपाचे असतील, असा तर्क मांडता येऊ शकेल का? ( ''पृथ्वीवर माणूस उपराच"" या नावाची लेखमालिका  तत्सम विषयावर  दिवंगत डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी "'सकाळ'" या वृत्तपत्रात लिहिली होती.)