चांदणं...

चांदणं...

चांदण्याराती आभाळ हललं
चांदण्याच सडं शिंपलं

चांदवं भुललं आकाशी भरकटलं
चांदणीचं मन गलबललं

चकोराला संदेश गेला
चांदणं पिऊन तो आला

चांदणी खुलली तेजाने चमचमली
चांदव्याच्या गाली खळं पडलं

राजेंद्र देवी