उमेद..

उमेद..

कोणी म्हणेल अर्धा सरला
कोणी म्हणेल अर्धा उरला
असेल त्याचा काठ ओला
नसेल कोरडा माझा पेला

जरी वठली सारी वनराई
असेल माझा देठ ओला
राहीन तग धरुनी मी
पाहण्यास उद्याच्या वसंताला

जरी अंत जगाचा जवळ आला
अजून माझा नाही आला
देऊन साथ होईन ऋणमुक्त मी
राहीन धनी तुझ्याच कुंकवाला

राजेंद्र देवी