पालवी...

पालवी...

आयुष्याच्या वृक्षाचे
गळू लागले
एक एक पान वयाचे
सारे आयुष्य पानगळीचे

येईल का पुन्हा पाऊस
येईल का पुन्हा वसंत
फुटेल का नवीन पालवी
का वठून जाईल वृक्ष?

ना मुळास चिंता
पण खोडाची जात
कोठून तरी हळूच डोकावेल
आशेची पालवी

राजेंद्र देवी