ख्रिस्त

शांततेचे गात गाणे 

अवतरलासी तू भूवरी या
पिचलेल्या गरिबांचा क्रूस 
वाहिलास खांद्यावरी या 
प्रेम दिधले तू जगाला
वेदना पचवूनीया 
का न समजली दयार्द्रता तुझी 
तुला खिळवणाऱ्या राक्षसांना 
अजूनही संहार होतो
भाविकांचा प्रेमळ जनांचा 
क्रूरपणे गिळता तयांना 
दिसेल का क्रोध लाजताना
नसती जरी सगळेच प्रेषित 
तुझ्यापरी देवाचे सुत
का प्रयत्नांना आज त्यांच्या 
कुचेष्टेचे बिरुद लाभे
हात मी निढळावरी लावुनी 
उभा इथे शतकानुशतके
वाट तुझी पाहताना 
देह पंचत्वी विलीन होतसे