चौथऱ्याचे दर्शन

     सध्या शनीच्या चौथऱ्यावरून चर्चा रंगली आहे. ज्यांना परंपरा मानायची असते, ते मानतात. ज्यांना मानायची नसते, ते मानत नाहीत. 
 सर्वांचा आदर ठेवून यासंदर्भात काही मुद्दे असेः
   ज्या चौथऱ्यावरून इतके रण माजले आहे, तो चौथरा व त्यावरील  शनीचे प्रतीक म्हणजे एक शिळा आहे. प्रत्यक्षात शनी अंतराळात आहे. त्याचे दर्शन महिला दुर्बीणीद्वारे घेऊ शकत असतील, असाव्यात. 
शनीमाहात्म्य हा ग्रंथही महिला वाचू शकत असतील, असाव्यात. मारुती हा शनीचा प्रतिनिधी समजला जातो. त्याचेही दर्शन महिला घेतात, घेऊ शकत असतील, असाव्यात.
    एवढे सगळे असेल तर शिळेच्या  दर्शनाला मज्जाव कशासाठी आहे, याबाबत संबंधितांनी विवेचन करावे.

 
    माझ्या वरील मुद्यांमधे  काही त्रुटी, गफलती असल्यास त्या अवश्य दाखवून द्याव्यात.