रिंगण

रिंगण

आयुष्याभोवती आखले एक रिंगण
नाही त्यास कोपरा
अविरत फिरतो आहे गरगरा

ना मी रिंगणाच्या आत
ना रिंगणाच्या बाहेर
परिघावरून चालतो आहे खरा

आयुष्याच्या रिंगणाला आहे
एकसारखी वळणं
अशक्य आहे त्यापासून पळणं

राजेंद्र देवी