ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
हिरा आणि हीरकमराठीत आपण ज्याला हिरा म्हणतो, त्याला हिंदीत हीरा म्हणतात. दूरचित्रवाणीवरून हिंदी बर्‍याच प्रमाणात कानावर पडत असल्यामुळे हिरा शब्दात हवर पहिली वेलांटी की दुसरी, असा प्रश्न पडू शकतो; म्हणून हे ध्यानात घ्यावे. हिर्‍याला संस्कृतमध्ये हीर व हीरक हे शब्द आहेत. साठ वर्षे पूर्ण होणे, या अर्थी हीरकमहोत्सव हा शब्द वापरला जातो.त्यात हवर दुसरी वेलांटी, हे लक्षात ठेवावे.
हिंस्रइतर प्राणी हेच ज्यांचे अन्न आहे, अशा वन्य प्राण्यांचे वर्णन हिंस्र या विशेषणाने केले जाते. क्रू र, भयंकर असेही या शब्दाचे अर्थ आहेत. हिंस् (ठार मारणे) या संस्कृत धातूपासून हिंस्र हा शब्द बनला आहे. दुखविणे, पीडा देणे असेही त्या धातूचे अर्थ आहेत. हिंस्रमध्ये सला र जोड्लेला आहे; स ला त्र व्हे, हे ध्यानात ठेवावे. ( हिंस्त्र असे लिहिणे चूक.)
हीरक महोत्सवयातील मूळ शब्द 'हीरक' आहे. याचा अर्थ हिरा. हा संस्कृत शब्द आहे. मराठीत हिर्‍याच्या तुकड्याला हिरकणी म्हणतात. व्यक्तीला किंवा संस्थेला ६ वर्षे पुरी झाली असता जो उत्सव करतात, त्याला हीरक महोत्सव म्हणतात. या शब्दात 'ह'ला पहिली वेलांटी देऊ नये.
हुशारहुशार हा शब्द आपण नेहमी वापरतो. बुद्धिमान, शहाणा, चलाख हे त्याचे अर्थ आपल्याला परिचित आहेत. सावध, दक्ष, ताजातवाना असेही त्यावे अर्थ आहेत. 'हुशार'मधील 'श' शहामृगातला आहे. तो षट्कोनातला नाही. तो षट्कोनातला लिहिण्याची चूक('हुषार') होऊ देऊ नये. 'हुशार'चे मूळ होशियार या फारसी शब्दात आहे. तो शब्द 'होश'वरून तयार झाला आहे. बुद्धी, ज्ञान, चेतना, हे 'होश'चे अर्थ आहेत.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide