ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
आत्मीयताआत्मन् या संस्कृत शब्दाचा एक अर्थ 'आपण' (स्वत:) असा आहे. आत्मीय या विशेषणाचे अर्थ स्वत:चे, स्वत:संबंधीचे, स्वकीय असे आहेत. 'आत्मीय' वरून आत्मीयता हे भाववाचक नाम बनले आहे. एखाद्या गोष्टीविषयी आत्मीयता असणे म्हणजे तीविषयी जवळीक, आपुलकी, जिव्हाळा असणे. आत्मीयता या शब्दातील जोडाक्षरावर दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. (आत्मियता असे लिहिणे चुकीचे.)
आद्याक्षरआद्याक्षर म्हणजे शब्दातील सुरवातीचे अक्षर . 'आद्य + अक्षर' अशी या शब्दाची फोड आहे. आद्य म्हणजे सुरवातीचे. लेखनात काही शब्द संपूर्ण वापरण्याऎवजी त्यांची आद्याक्षरे वापरली जातात. (उदाहरणार्थ - श्रीयुतऎवजी श्री, प्राध्यापकऎवजी प्रा., तारीख ऎवजी ता. इत्यादी.) आद्याक्षर हा शब्द अद्याक्षर असा लिहिण्याची चूक होऊ शकते. तसे झाल्यास अर्थही चुकीचा होतो. (अद्य याचा अर्थ आज असा आहे.)
आधिक्यअधिक या विशेषणापासून आधिक्य हे भाववाचक नाम बनले आहे. अधिक म्हणजे जास्त, हे आपल्याला माहीत आहे. अतिशय, जोराचे, श्रेष्ठ हेदेखील 'अधिक'चे अर्थ आहेत. आधिक्य म्हणजे आधिकपणा, श्रेष्ठत्व. 'आधिक्य'मध्ये पहिले अक्षर 'आ' आहे; 'अ' नव्हे, हे ध्यानात घ्यावे. निवडणुकीच्या निकालासंदर्भात 'मताधिक्य' हा शब्द तुमच्या वाचनात आला असेल. 'मत+आधिक्य' अशी त्याची फोड आहे.
आनुषंगिकअनुषंग म्हणजे निकटचा संबध; साहचर्य. त्यावरुन आनुषंगिक हा शब्द तयार झाला. 'अनुषंगमधील पहिले अक्षर 'अ' असले, तरी 'आनुषंगिक'मधील पहिले अक्षर 'आ' आहे, हे ध्यानात ठेवावे. या शब्दातील 'ष' षट्कोनातला आहे; शहामृगातला नव्हे. या शब्दात 'ग'वर पहिली वेलांटी अहे, हेही लक्षात घ्यावे. 'आनुषंगिक'चा अर्थ तत्संबंधी, बरोबर येणारा असा आहे. गौण, बेताचा हेही या शब्दाचे अन्य अर्थ आहेत.
आबालवृद्धआबालवृद्ध म्हणजे बालांपासून वृद्धांपर्यंत; म्हणजेच सर्व वयांची माणसे. हा शब्द अबालवृद्ध असा लिहिण्याची चूक होऊ शकते. मग त्यात अपेक्षित अर्थ राहत नाही. (अबाल हे संस्कृतमधील एक विशेषण आहे. त्याचा अर्थ तरूण; पूर्ण वाढलेला, असा आहे.) आबालवृद्ध हा शब्द चुकीचा लिहिला जाऊ नये, यासाठी 'आ ' हा उपसर्ग लक्षात ठेवावा. त्याचे जे विविध अर्थ आहेत, त्यांतील पासून आणि पर्यंत येथे अभिप्रेत आहेत. आपादमस्तक (पायापासून डोक्यापर्यंत), आमूलाग्र (मुळापासून टोकापर्यंत, म्हणजे संपूर्णपणे) हेही शब्द असेच तयार झाले आहेत.
आमिषआमिष या संस्कृत शब्दांचा अर्थ लालू च. 'आमिष दाखविणे' म्हणजे एखाद्याला वश करून घेण्यासाठी, तो मोहात पडेल असे काही देण्याची तयारी दाखविणे. या शब्दात चुकून 'आऐवजी'अ लिहिला जाण्याची, तसेच 'मि'ऐवजी 'मी' लिहिले जाण्याची शक्यता असते. 'आमिष'चा अर्थ मांस असाही आहे. सामिष (मांसासह) व निरामिष (मांसविरहित) हे शब्द त्यावरूनच तयार झाले. ते हिंदीत रूढ आहेत.
आरूढआरूढ या शब्दाचा अर्थ वर बसलेला; चढू न गेलेला. सिंहासनारूढ म्हणजे सिंहासनावर बसलेला. आधिकारारूढ म्हणजे अधिकारपदावर असलेला. आरोहण म्हणजे वर जाण्याची, चढू न जाण्याची क्रिया. यावरूनच गिर्यारोहण (गिरि आरोहण) हा शब्द बनला आहे. आरूढ या शब्दात रला दुसरा उकार आहे, हे ध्यानात ठेवावे. (आरुढ असे लिहिणे चूक.) अरूढ असे लिहिणेही चूक. ही चूक टाळावी.
आविष्कारएखादी गोष्ट व्यक्त करणे, प्रकट करणे, यात जी क्रिया अभिप्रेत असते, तिला आविष्कार म्हणतात. (उदा. गायनाविष्कार, नाट्याविष्कार.) आविष्कार या शब्दातील पहिले अक्षर 'अ' नसून 'आ' आहे, हे लक्षात घ्यावे. 'आविस्' आणि 'कृ' या शब्दांपासून हा शब्द बनला आहे. 'आविस्' चाअर्थ प्रकट वा उघड. कृ या धातूचा अर्थ करणे. आविष्करण याही शब्दाचा अर्थ 'आविष्कार' प्रमाणेच आहे.
आशीर्वादआशीर्वाद देणे म्हणजे दुवा देणे, भले व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे. आशीर्वाद या शब्दात 'श'वर दुसरी वेलांटी असते. अनेकजण 'श'वरती पहिली वेलांटी देऊन 'आशिर्वाद' असे लिहितात. ते चुकीचे आहे हे लक्षात ठेवावे. तसेच या शब्दातील रफार हा 'वा' वर आहे, 'शी' वर नाही. काहीजण चुकून हा शब्द 'आर्शीवाद' असा लिहितात.
आश्विनपंचांगातील महिन्यांची नावे तुम्हाला तोंडपाठ असतील. मराठी महिने असाही त्यांचा उल्लेख होतो. त्यांतील भाद्रपदानंतरच्या महिन्याचे नाव तुम्ही कदाचित अश्विन असे लिहीत असाल. वास्तविक त्या शब्दातील पहिले अक्षर अ नसून आ आहे. अश्विनी हे २७ नक्षत्रांतील पहिले नाव; त्यात मात्र आ नसून अ आहे. पहिल्या अक्षराबाबत या दोन शब्दात गल्लत होऊ देऊ नका.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide