ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
कर्तृत्वकर्तृत्व या संस्कृत विशेषणाचा अर्थ 'करणारा'. त्यापासून कर्तृत्व हे भाववाचक नाम तयार झाले आहे. कर्तेपणा, सामर्थ्य, कार्य करण्याची क्षमता या अर्थांनी कर्तृत्व हा शब्द वापरला जातो. यातील दुसरे अक्षर नीट लक्षात ठेवा. हा शब्द 'कतुर्त्व' असा लिहिलेला कदाचित आढळेल; पण तो अपभ्रंश आहे. 'कर्तृत्व'मध्ये शेवटचे अक्षर 'त्त्व' नसून 'त्व' आहे, हेही ध्यानात घ्या.
कर्मधारय समासया समासात दोन पदांमधील पहिले पद पुढच्या पदाचे गुणविशेषण असते. उदा. पांढराशुभ्र, हिरवागार, काळाभोर, लालभडक. या शब्दांमुळे त्या शब्दांचा 'विशेष गुण' लगेच लक्षात येतो. मात्र या शब्दांत डॅश टाकू नये. उदा. लाल-भडक असे न लिहिता लालभडक असेच लिहावे.
किडूकमिडूकमराठीत काही शब्दांपुढे निरर्थक अक्षरे वापरून यमक साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दुसर्‍या शब्दाला स्वतंत्र अर्थ नसतो. त्यामुळे असे शब्द एकत्रच लिहावेत. किडूक-मिडूक असे तोडून लिहू नये. मिडूक असा स्वतंत्र शब्द नाही. याचप्रकारची आणखी काही उदाहरणे अशी आहेत - बारीकसारीक, अघळपघळ, गोडधोड.
किल्मिषकिल्मिष हा शब्द काळेबेरे, पाप, शका या अर्थांनी , मनाच्या बाबतीत वापरला जातो.(मनात काळेबेरे असणे.)मळ हादेखील या शब्दाचा अर्थ आहे. या शब्दाच्या लेखनात दोन प्रकारांच्या चुका होण्याची शक्यता असते. जोडाक्षरावरील वेलांटी चुकून दीर्घ दिली जाते वाष ऎवजी चुकून श लिहिला जातो. ष षट्कोनातला; तसेच दोन्ही वेलांट्या पहिल्या, हे या बाबतीत लक्षात ठेवावे.
कीटककीटक म्हणजे किडा. कीटकमध्ये कवर दुसरी वेलांटी आहे हे ध्यानात ठेवावे. चुकून पहिली वेलांटी दिली जाण्याची शक्यता असते. सामान्यरूप होतानाही ही वेलांटी बदलत नाही. किटकाला, किटकावर, किटकाचे असे लिहिण्याच्या चुका अनेकांकडून होतात. कीटकाला, कीटकावर, कीटकाचे असे लिहावे. कीटक या शब्दापासून होणार्या सामासिक शब्दातही की हे अक्षर दीर्घच राहते.(उदाहरणार्थ - कीटकदंश, कीटकनाशक).
कुतूहलकुतूहल म्हणजे उत्सुकता, जिज्ञासा, एखाद्या गोष्टीविषयी कुतूहल वाटणे म्हणजे ती जाणून घेण्याची, तिची माहिती मिळविण्याची इच्छा उत्पन्न होणे. आश्चर्य असाही कुतूहल या शब्दाचा एक अर्थ आहे. कुतूहलमध्ये तला दुसरा उकार असतो व सामान्यरुपातही त्यात बदल होत नाही. (उदाहरणार्थ - कुतूहलाने). या शब्दातील तू हे अक्षर अनेक जण चुकून र्‍हस्व उच्चारतात व लिहितानाही तशी चूक होऊ शकते.
कुलाचारयातील मूळ शब्द 'कुल' आहे. याचा अर्थ आहे कुटुंब. 'कुलाचार' म्हणजे पूर्वपरंपरेने चालत आलेले, रीतिरिवाज. या शब्दात 'क'ला पहिला उकार द्यावा. 'कूलाचार' असे लिहू नये.
कुसुमकुसुम म्हणजे फूल. हे विशेषनाम म्हणूनही वापरतात. हा शब्द संस्कृत (तत्सम) आहे. तत्सम शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार र्‍हस्वच राहतात. या नियमानुसार हा शब्द कुसूम असा लिहू नये. क व स ला पहिला उकारच द्यावा.
कूपमंडूकसंकुचित विचाराच्या व्यक्तीला कूपमंडूक म्हटले जाते. 'कूप + मंडूक' अशी या शब्दाची फोड आहे. कूप या शब्दाचा अर्थ विहीर. मंडूक म्हणजे बेडूक. बेडूक जेथे राहतो, ती विहीर वा डबके हेच त्याचे जग असते. त्याप्रमाणे स्वत:पुरत्या अतिमर्यादित क्षेत्राखेरिज जे अन्य विचार करीत नाहीत, त्यांचे वर्णन कूपमंडूक या शब्दात केले जाते. या शब्दात 'क' आणि 'ड' या दोन्ही अक्षरांना दुसरा उकार आहे.
कूर्मकूर्म म्हणजे कासव. भगवान विष्णूंच्या दशावतारापैकी हा दुसरा अवतार. या शब्दात कल दुसरा उकार आहे, हे ध्यानात ठेवावे. (कुर्म असे लिहिणे चूक.) सामान्यरूपातही हा उकार बदलत नाही. (उदाहरणार्थ कूर्माला, कूर्माचे). कासवाचा चालण्याचा वेग फार मंद असतो; म्हणून मंदगतीला कूर्मगती म्हणतात. सामासिक शब्दांतही कूर्ममधील कू दीर्घच राहतो. (उदाहरणार्थ कूर्मावतार, कूर्मगती.)
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide