ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
कूर्मासनयातील मूळ शब्द 'कूर्म' आहे. कूर्म म्हणजे कासव. योगासनातील एका प्रकाराला कूर्मासन म्हणतात. या शब्दात 'क'ला दुसरा उकार व 'म'वर रफार द्यावा.
कॢप्तीकॢप्ती (मूळ संस्कृत शब्द कॢप्ति) या शब्दांचे, युक्ती, रचना सिद्धी, समृद्धी असे विविध अर्थ असले, तरी हा शब्द मराठीत प्रामुख्याने युक्ती वा शक्कल याच अर्थी वापरला जातो. कॢप्त या संस्कृत विशेषणाचे अर्थ केलेले, रचलेले, ठरविलेले इत्यादी आहेत. कॢप्ती हा शब्द 'क्लुप्ती' असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. ऌ हा वर्णमालेतील एक स्वर आहे; उकार नव्हे.
कोजागरीआश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागरी म्हणतात. या शब्दाचे मूळ को जागर्ति? (कोण जागा आहे?) या प्रश्नात आहे. त्या पौर्णिमेच्या रात्री सर्वांना देवी लक्ष्मी हा प्रश्न विचारते, अशी समजूत आहे. जो जागा असतो, त्याला देवी संपत्ती देते, असे म्हणतात. कोजागरी हा शब्द लिहिताना 'ग' ऎवजी गििलहिला जाण्याची (कोजागिरी) चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी को जागर्ति? हा प्रश्न लक्षात ठेवावा.
कोट्यधीशकोट्यधीश या शब्दाची फोड कोटि+ अधीश अशी आहे. कोटिहा संस्कृत शब्द मराठीत कोटी असा लिहिला जातो. त्याचा एक अर्थ शंभर लाख असा आहे. अधीश म्हणजे धनी, मालक. ज्याच्याकडे एक कोटी रुपये वा त्याहून अधिक मालमत्ता आहे, तो कोट्यधीश. हा शब्द कोट्याधीश असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. कोट्यवधी (अनेक कोटी) याही शब्दातील जोडाक्षर ट्य आहे; ट्या नव्हे.
क्रांतिकारकक्रांती (मूळ संस्कृत शब्द क्रांति) या शब्दापासून क्रांतिकारक हा शब्द तयार झाला आहे. क्रांती या शब्दाचे उलथापालथ, सर्वगामी बदल हे अर्थ आहेत. भ्रमण, प्रगती असेही त्याचे अर्थ आहेत. क्रांतिकारक म्हणजे क्रांती करणारा. या शब्दात तवर पहिली वेलांटी आहे, हे लक्षात घ्यावे. (क्रांतीकारक असे लिहिणे चूक.) क्रांतिवृत्त, क्रांतिवीर अशा शब्दांतही तवर पहिली वेलांटी आहे.
क्रीडाक्रीडा म्हणजे खेळ. 'क्रीड्' या संस्कृत धातूचा अर्थ खेळणे; त्यापासून हा शब्द बनला. क्रीडा, क्रीडांगण हे शब्द नेहमी वापरले जातात. त्यांतील पहिले अक्षर अनेकजण चुकून र्‍हस्व (क्रिडा) लिहितात. 'क्र'वर दुसरी वेलांटी, हे लक्षात ठेवावे. सामान्यरूप होतानाही ती बदलत नाही. (उदा.- क्रीडेला, क्रीडेच्या) क्रीडक या संस्कृत शब्दाचा अर्थ खेळाडू. खेळात तरबेज असणार्‍याला क्रीडापटू म्हणतात.
क्लेशपीडा, यातना, त्रास, हालअपेष्टा या अर्थांनी क्लेश हा शब्द वापरला जातो. या शब्दात श शहामृगातला आहे; षट्कोनातला नव्हे, हे ध्यानात ठेवावे. (क्लेष असे लिहिणे चूक.) क्लेश देणारे असते, ते 'क्लेशकारक'. क्लेश हा शब्द नेहमी अनेकवचनात वापरला जातो. (हाल हा देखील शब्द अनेकवचनातच वापरला जातो.) क्लेश झाला असे न लिहिता क्लेश झाले असे लिहावे.
क्षणभंगुर'क्षणात नाश पावणारे' हा क्षणभंगुर या विशेषणाचा शब्दश: अर्थ आहे. क्षणिक, अशाश्वत या अर्थांनी हा शब्द रुढ आहे. भंगुर या विशेषणाचा अर्थ भंगणारे, ठिसूळ असा आहे. क्षणभंगुर या शब्दात गला पहिला उकार, हे ध्यानात घ्यावे . (क्षणभंगूर असे लिहिणे चूक.) क्षणिक या विशेषणात 'ण'वर पहिली वेलांटी, हेही लक्षात ठेवावे. (क्षणीक असे लिहिणे चूक.)
क्षत्रियपूर्वी वर्णव्यवस्था होती; तिच्यातील दुसर्‍या वर्णाचे नाव क्षत्रिय होते. हा शब्द क्षत्र या शब्दापासून बनला आहे. योद्धा, वीरपुरूष हा क्षत्र चा अर्थ आहे. क्षत्रिय या शब्दात त्रवर पहिली वेलांटी आहे. (क्षत्रीय असे लिहिणे चूक.) क्षात्र या शब्दाचा अर्थ क्षत्रियांसंबंधी असा आहे. क्षात्रधर्म म्हणजे शौर्य, धैर्य . क्षात्रवृत्ती, क्षात्रतेज याही शब्दांचा उगम क्षत्र या शब्दात आहे.
क्षुद्रकिरकोळ, हलका, लहान या अर्थी क्षुद्र हे विशेषण वापरले जाते. क्षुद्र या नामाचा अर्थ वैगुण्य असा आहे. मराठीत हे नाम रूढ नाही. क्षुद्र या शब्दात 'क्षला पहिला उकार आहे. तो दुसरा लिहिला जाण्याची चूक ('क्षूद्र) होऊ शकते; ती टाळावी. क्षुद्रदृष्टी या शब्दाचा अर्थ कोते मन वा अनुदार वृत्ती. क्षुद्रचंपक(नागचाफा), क्षुद्रचंदन(रक्तचंदन) आदी शब्द 'क्षुद्र'पासून तयार झाले आहेत.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide