सुन्दर पहाट

पहाटेचा प्रसन्न वारा

चांदण्यांचा आगळा नूर
त्यातच कुठुनसा आला 
मुरलिचा मंजुळ सूर 
कुण्या कान्हाने घातली
कुण्या रधिकेला साद
कुठे मंदिरात घुमे
घंटेचा अंतर्नाद
गंगेच्या लाटान्वर 
उठे गोड शिरशिरी 
फुल पाकळ्यांच्या उरी
स्वप्नं किरणांची गोजिरी
अशी सुंदर पहाट
स्रुष्टी न्हालेली सचैल 
आकाशात रंगलेली
सूर्यदेवाची मैफल