एका लग्नाची कहाणी
ऐका एका लग्नाची कहाणी
कोकीळ गात होता गाणी
शुभ-अशुभ सांगे भारद्वाज भट
स्वागता सज्ज अनेक द्विज गट
कांव-कांव निमंत्रण करी कावळा
धवल पुष्पमाळा आणी बगळा
गुटर-गुं पाहुण्यांशी करी कबूतर
मनरंजना नृत्य करण्या मयूर
अक्षदा वाटी चिमणा-चिमणी
तोऱ्यात कोंबडा करी पहाणी
घरटी टांगी लगबग बया
झुम्बरानी मंडप सजवाया
लक्षी-वाहनाने (घुबड) पाठविले आंदण
करा रे गुलाब पाण्याचे शिंपण
सुतार पक्ष्याचे एकताल वादन
होणार शुभ-मंगल सावधान
उडाला फटाक्यांचा बार
क्षणात झाले पक्षीगण पसार
विजया केळकर ___