श्रावण....

श्रावण....

दाटून आले नभ
बरसेल आता श्रावण

भिजेल माती भिजेल शेती
भिजतील कोवळी तृणपाती

भिजेल मन भिजेल तन
भिजेल ओली आठवण

पुन्हा ठसठसेल ओली आठवण
पाझरतील नयन भिजेल श्रावण

राजेंद्र देवी