बंडखोर मन माझे....

बंडखोर मन माझे....

मन माझे लागले
बंड करू
सांग आता
तुला कसे मी विसरू

सरला दीस अन
लागला अंधार पसरू
सांजवेळीच्या आठवणी आपल्या
सांग कसे विसरू

सोडून गेल्या सावल्या पण
त्यांचा कसा विश्वास धरू
विसरण्यास तुला लागल्या
आठवणी बंड करू

शेवटचेच सांगतो
जा विसरून मला तू
नको मला स्मरू
डळमळते मन माझे
लागले आता घसरू

राजेंद्र देवी