पाघोळ्या .....

पाघोळ्यांचे पाणी पाहत,

           टपरी आड उभा राहिलो  ......

विसरलेल्या छत्रिसाठी

कुसत मनात राहिलो .........

भुर्कन उड्वून पाणी

आली  ती ही आडोशाला  .....

काळेभोर केसान्वर दवबिंदु लगटले

लटक्या रागने दूर त्याना सारले .........

झटकली मान, पदर जरा  सावरला ,

अत्तर्राचा फवारा माझ्यावरी शिडकला .......

थोडीशी ती वरमली .....

तिच्या-माझया नजरेची मिठी तीने सोडविली .....

जन्मांचा पाऊस ,

मनात माझ्या कोसळला .......

तोल सावरण्याचा असफल

प्रयत्न मी केला ...........

कधी नव्हे तो पाऊस आज

असा काही बरसला ....

तिच्या माझ्या भेटीसाठी का

खेळ त्याने मांडला .........

घ्यायची का कॉफी

हळूच तिला विचारले ............

हसून नकार द्यायचा

तिने मला शिकविले .........

नकारने तिच्या , ती अधिकच भावली

ऱ्हदयची धडधड वेगाने वाढली .....

नको म्हणालो तरी,

 अचानक तो थांबला ..

मात्र तीने मोक

   अवचित साधला ......

आभाळ आलय भरून

सुगंध तीचा दरवळतो ...

पाघोळ्यांच्या आडोश्यात

तिला पुन्हा शोधतोय........