भावमय निसर्ग
रजतमय गगन रातभर
तारकांमय भुवन परिसर
प्रेममय युगुल निरखी शशी
अंधकारमय उदास नव्हती निशी
गतिमय चक्र उचली पाऊल
तेजोमय रविचक्रास लागली चाहूल
तन्मय होऊन हे सांगे शुक्र-चांदणी
संगीतमय संगत देती खग-गाणी
केशरमय उटी लावली प्राचीवरी
गंधमय धावल्या पवन लहरी
सुरमय प्रभात नभी रंगली
गोमय सडे व रांगोळीने अंगणे सजली
श्रीमयी धुंद व्हावे ऐसी पहाट
नादमय ज्योतिर्मय ऐसा तिचा थाट
प्रकाशमय राज्य आता दिनभर
स्नेहमय विजयी जीवन करी दिनकर
विजया केळकर ___