साकडे

साकडे....

पाऊस आला पाऊस आला
दुथडी भरून वाहू लागला नाला
मुळा की मुठा काय म्हणती त्याला
नदी शब्दच विस्मरणात गेला

लंडन ब्रिजचे काय कौतुक
थेम्सतीरीच्या त्या गौरवर्णीयाला
नाही पाहिला त्यांनी
नागमोडी पुल पुण्यातला

राडारोडा निर्माल्य टाकीती
कोण ते माहीत नाही आम्हाला
जो तो फक्त बोट दाखवे
पुण्यातल्या प्रशासनाला

मी पण एक पुणेकर त्यातला
भीत नाही कोणाच्या टोमण्याला
एकच साकडे आगामी गणरायाला
बुद्धी दे आम्हा पामराला

राजेंद्र देवी