मनोराज्य...

मनोराज्य...

पाहून शेतकऱ्यांचे हाल
नभ गहिवरून आलं
होतं नव्हतं ते सारं
जमिनीवर रितं केलं

भिजली धरती शिवार झालं ओलं
पान अन पान तरारून आलं
उगवत्या सूर्याने प्रकाशाच अर्ध्य दिलं
तन मन सारं मोहरून आलं

झाला मदमस्त पवन, सारं शिवार डोललं
कृषीकन्येच्या मनाचं भांडार खुलं झालं
नाही कोणी आता झाडाला लटकलं
वरुणराजाने साऱ्याचं भलं केलं

राजेंद्र देवी