हात चांदण्याचे

मी करू कशाला 

सुखाशी दोस्ती 
दुःखालाही पोळती
चांदण्याचे हात माझे
कशास बाळगू मी
भीती आता अंधाराची
काळीज हे भंगले
खुल्या उजेडात माझे 
गायले पुन्हा पुन्हा मी
गीत जीवनाचे
सूर सारेच ज्याचे 
गाहिऱ्या तमात होते 
उरले ना भय मज
आता मरणाचे 
दडलेत उःशाप सारे
सरणात माझे.....
...............................उद्धव कराड. मो. नं. ९८५०६८३०४५.