खंत...

खंत....

माझ्या कल्पनेचे धागे
वास्तवाशी बांधले आहेत
माझ्या कवितांमध्ये शब्द
भावनेशी सांधले आहेत

आयुष्यातील सत्य
चार ओळीत मांडले आहे
कर्तृत्व नशिबाशी
उगाच भांडले आहे

कैक पेले सरले आहेत
कैक पेले उरले आहेत
का खंत करीसी वेड्या
अजून बरेच आयुष्य उरले आहे

राजेंद्र देवी