ऑगस्ट २२ २०१६

जरी हे तेवढ्या पुरतेच बोलू

जरी हे तेवढ्या पुरतेच बोलू
तुझा मी रहिलो इतके बोलू

तुला बघताच वाटे नेहमी की,
जगाला  टाळुनी नुसते बोलू

अश्या धुंदीत राहू बोलतांना
हवे ते सोडुनी भलते बोलू

कशाला वायफळ चर्चा नकोत्या
जरा बोलू, तुझे मझे
 बोलू

नकोसा वाटतो आता अबोला
तुला जितके हवे तितके बोलू
                              -स्नेहदर्शन 

Post to Feed

हि ओरिजिनल आहे की
आपण मला ओळखखत नाही

Typing help hide