श्रावणभूल

एक शलाका नभास छेदून गेली
तुझ्या आगमनाची वर्दी देऊन गेली

विचाराने तुझ्या, हृदयी धडधड वाढली
जणू ज्वालामुखीने धरणी कंप पावली

तुझ्या आगमनाची सारी तयारी झाली
मेघांनी सारी सृष्टी न्हाऊन गेली

सारे रस्ते सजले फुलांनी
श्वासात सारे वास मिसळून गेली

ऊन सावलीचे खेळ खेळता
श्रावणभुल पण हरखून गेली

राजेंद्र देवी