कामगार....

कामगार....

सायंकाळी रोजगार सारा
गुत्त्यावर झोकुनी गेले

घंटानाद करीती पुजारी परी
देव अन दैव त्यांचे झोपुनी गेले

मिटले डोळे सरणावरी
घेणेकरी हात शेकून गेले

वाहत्या नदीत राखेबरोबर
कुंकू कुणाचे वाहून गेले

वसूल करावयाचे म्हणुनी उरले सुरले
तेराव्याचे जेवून गेले

माय उपाशी, पदराआड पोर,
ओठ त्याचे सुकून गेले

राजेंद्र देवी