व्यवधान

व्यवधान

तोच वारा तोच तारा

अन् तोच आसमंत सारा

स्थल काल मितीची

भेदू कशी अभेद्य कारा..

जाणिवांच्या जाळ्याला जुनकट

पेलवेल का अवकाश हे

वस्तुमानाची वक्र वर्तुळे

घेरती  अनुमान हे

एका बिंदूमध्ये माझे

अस्तित्व म्हणे ठासून होते

बुडबुड्याचा स्फोट होता

कालसर्प फुत्कारत होते

प्रकाशाचा  उठतो फुफाटा

ज्ञान परि दृग्गोचर नसते

अंतरातल्या प्रतिविश्वांचे

अंतरालाही व्यवधान नसते

- अभिषेक