आपलं नातं

आपलं नातंच निराळं...  
अनोखं.... 
भेट... 
शब्दांनी शब्दांशी... 
संवाद... 
मनाने मनाशी... 
ओळख... 
नजरेने नजरेशी... 
दोघांमधलं एकाकीपण... 
'आपलेपण' जपणारं... 
याच एकाकीपणात 
मन घालतय तुला साद 
देशील का सखे
हाती तुझा हात
हवीय मला तुझ्या
शब्दांची साथ ....
आपलं नातंच निराळं...  
अनोखं.... 
:: manish