फेब्रुवारी २०१७

येथे पाहिजे जातीचे ....

एक होता गुरू
त्याचा एक महागुरू
भेटल्यावर म्हणाले,
" आपण अभ्यास करू
आणि चराचरात शिरू "

मी म्हटले , " ओके " 
त्यांनी मला वह्या दिल्या 
मी त्यांच्या नावाने त्या भरवल्या 
त्यांना अर्पण केल्यावर 
हसून ते म्हणाले, "
" भल्या गृहस्था, हा कसला अभ्यास ? "
आम्ही आधुनिक गुरू
वेगवेगळ्या धंद्यात शिरू,
यात तर धंद्याचा लवलेशही नाही
अर्थाचा नुसता अनर्थ आहे
काल हरणासाठी अर्थ हवा
जो इतरांकडून घ्यावा
आणि गोणींमध्ये भरावा

कालसर्प, राहू शांत , नारायण  नागबली
मनः शांती, ही तर आमची हत्यारे 
तुला जमत नसेल तर
कितीतरी आहेत अनुसरणारे
मुकाट बाजूला हो,
सामान्य पुचकट माणसाचे काम नाही
येथे पाहिजे जातीचे 
येरा गबाळाचे काम नव्हे. 

Post to Feed


Typing help hide