काळ...

काळ...

नाही पाहू शकलो स्वप्ने उद्याची
वर्तमानात झोपलोच नाही
थकले तन माझे
मन अविरत चालत राही

नाही पाहू शकलो दिवास्वप्ने
भूतकाळाने पिच्छा सोडला नाही
ना रमलो मी भूतकाळांत सुद्धा
भविष्याची चिंता त्राही त्राही

आयुष्याचे व्याकरण
कधीच जमले नाही
तिन्ही काळ , ना पूर्णं, ना अपूर्णं
सारे चालू काळातच राही

राजेंद्र देवी