फेब्रुवारी १५ २०१७

शुक्र चांदणी

    शुक्रचांदणी

पश्चिमद्वारी  महाली  नीलतटी
  उभी चटकचांदणी एकटी 
घेऊन  हाती   वाटी
  वाटीत केशर चंदनाची उटी 

थकल्या भागल्या सख्याच्या लावण्या पाठी 
चिंतातूर, लुकलुक सारखी त्या साठी 
होता विचार बरवा, सांजवेळी मिळेल थंडावा  
पण!! कथितो अलगची झुळकीचा गारवा

केलीस त्वरा पण सोडून गेला सखा 
पडला धरा, तीर्थी; आता तीज धरा 
म्हणत चंद्रीकांचा पडला घेरा 
न लागली हाता शोधता तट अख्खा 

बेभान, रात सरता, येई भानावर 
भानु वर येता असावे हजर 
लगबग मग पूर्वद्वारा ठाकली उभी 
उत्सुक बहु,शिवाय कोणी ही नव्हते नभी 

कुंकुमतिलक लावून ओवाळी आरती 
पद स्पर्शून लोळण घेतली सख्याच्या पायावरती 
लीन होता, लुप्त झाली 
जाता जाता शुक्र चांदणी वदली- पहाट झाली   
                      ~~~~~~~~~
       विजया केळकर  Post to Feed


Typing help hide