एप्रिल २७ २०१७

बेभान हा वारा

बेभान हा वारा

खूप काहीललेला जीव
आता येतील अमृतधारा
मृद्गंध पिऊन होईल 
बेभान हा वारा

तृप्त होईल धरती
निसर्ग होईल सचेतन
काळ्या मेघात चमकेल
दिसेल विद्युल्लता शोभून

नवचैतन्याची येईल लहर
निसर्गात फ़ुलेल बहर
पागोळ्यांतून कोसळतील
टप टप जलधारा
मृद्गंध पिऊन होईल 
बेभान हा वारा, बेभान हा वारा

राजेंद्र देवी


Post to Feed


Typing help hide